Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबसपाची आक्रमक चाल : नगराध्यक्षपदासाठी चैताली मद्रिवार मैदानात

बसपाची आक्रमक चाल : नगराध्यक्षपदासाठी चैताली मद्रिवार मैदानात

मूल, प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीत बसपाने जोरदार आक्रमक भूमिका घेतली असून आज नगराध्यक्ष पदासाठी चैताली मद्रिवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना बसपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. तरुण, उच्चशिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वावर पक्षाने दाखविलेला विश्वास शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

चैताली मद्रिवार यांनी शहरातील महिलांच्या शिक्षणासाठी व सामाजिक उपक्रमांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. ग्रामीण व निमशहरी भागातील मुलींना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शैक्षणिक सहाय्य देत त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांच्या या योगदानामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मूल शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरिक सुविधा आणि युवकांसाठी रोजगारपर उपक्रम—या सर्व मुद्द्यांवर चैताली मद्रिवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. शहराला सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले.

बसपाकडून नगरसेवक पदासाठीही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
नितेश विलास मेश्राम, प्रभाग क्र. ९ (ब) सर्वसाधारण
ॲड. पौर्णिमा ललित गेडाम, प्रभाग क्र. ७ (ब) सर्वसाधारण
यांनी आपापली नामांकनपत्रे दाखल केली आहेत.

बसपाच्या या हालचालींमुळे मूल नगरपरिषद निवडणुकीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून चैताली मद्रिवार यांच्या उमेदवारीमुळे येणारी लढत अधिक चुरशीची ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular