Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबल्लारपूर पब्लिक स्कुल मूल येथे चार दिवशीय क्रीडा स्पर्धा तथा विज्ञान प्रदर्शन...

बल्लारपूर पब्लिक स्कुल मूल येथे चार दिवशीय क्रीडा स्पर्धा तथा विज्ञान प्रदर्शन महोत्सव चे आयोजन

मूल रवि बरडे ( प्रतिनिधी )

मूल मधील नामांकित बल्लारपूर पब्लिक स्कुल मध्ये चार दिवशीय क्रीडा स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले 
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद बोलिवार होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषक विद्यालय सुशी चे अरुण चिंचघरे, शैक्षणिक प्रभारी दुर्गा कोटगले उपस्थित होते 
विविध खेळाच्या माध्यमातून विध्यार्थी चा सर्वांगीण विकास व्हावा या करिता क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड अनिल वैरागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवभारत विद्यालय चे  प्राचार्य अशोक झाडें देवणील विद्यालय चे प्राचार्य राजेश सावरकर स्व बापूजी पाटील  विद्यालय राजगड चे धवस सर कर्मवीर महाविद्यालय चे प्रा. आगलावे सर उपस्थित होते.
 या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरानी क्रीडा क्षेत्रात तसेंच  विज्ञान वैज्ञानिक व इतर  विषयावर उपस्थित विध्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले 
  त्यानंतर विज्ञान प्रदर्शन उदघाटन  अध्यक्ष यांचे हस्ते करून विज्ञान प्रदर्शन ची पाहणी करीत विध्यार्थी ला शुभेच्छा दिल्या  विज्ञान प्रदर्शनी व इतर विषयांच्या परीक्षक म्हणून शिक्षिका शारदा कोटगले, हिना वाघाडे, तोषी जयस्वाल, दर्शना शैलेकर ह्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोषी जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन दुर्गा कोटगले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी यांनी केले

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular