मूल : मूल येथील होमगार्ड उपपथकाचा ७९ वा वर्धापन दिन दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर मा. कातकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
केंद्र नायक रविंद्र चरडे, प्रशासकीय अधिकारी नंदा सूर्यवंशी व पलटण नायक नरेश राहूड यांच्या नेतृत्वाखाली, मूल येथील होमगार्ड प्रभारी अधिकारी सिद्धार्थ रामटेके तसेच वरिष्ठ पलटण नायक वंदना गेडाम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंशकालीन लिपिक रविंद्र भेंडारे, सेक्सन लीडर रविंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त क्रीडा संकुल परिसरात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. क्रीडा संकुल ते गांधी चौकापर्यंत शिस्तबद्ध रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात वृक्षारोपण करून होमगार्ड पथकाने वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी प्रभारी अधिकारी सिद्धार्थ रामटेके व वरिष्ठ पलटण नायक वंदना गेडाम यांनी उपस्थित होमगार्ड पथकाला मार्गदर्शन करत होमगार्डच्या कर्तव्य, शिस्त व सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपपथकातील ए.एस.एल. प्रवीण निंबाळकर, भारत वाळके, सुरेश गोंधळे, चंद्रदीप शेंडे, ए.एस.एल. वनिता भेंडारे, मंगला चौधरी, सोनिया डोर्लीकर, सारिका डांगे यांच्यासह सर्व पुरुष व महिला होमगार्ड यांनी सहकार्य केले.



