Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल नगरपरिषद निवडणूक : बसपाकडून नगराध्यक्ष पदासाठी चैताली मद्रिवार यांची दमदार दावेदारी

मूल नगरपरिषद निवडणूक : बसपाकडून नगराध्यक्ष पदासाठी चैताली मद्रिवार यांची दमदार दावेदारी

मूल, प्रतिनिधी :
मूल नगरपरिषद निवडणुकीचे ढोल ताशे वाजू लागले असून विविध पक्षांतून उमेदवारांची नावं पुढे येऊ लागली आहेत. यामध्ये बहुजन समाज पार्टीकडून (बसपा) नगराध्यक्ष पदासाठी चैताली मद्रिवार यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. उच्चशिक्षित, तरुण, प्रामाणिक आणि शहराच्या विकासाबाबत ठोस भूमिका असलेल्या या उमेदवारामुळे बसपाची निवडणुकीतील लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

चैताली मद्रिवार या मूल शहरातील ओळखलेले व्यक्तिमत्त्व. विशेषतः युवती आणि महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील दुर्लक्षित मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांद्वारे मदत करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नावाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

मूल शहराचा विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था आणि नवीन उपक्रमांची अंमलबजावणी या बाबींवर चैताली मद्रिवार यांची स्पष्ट व कटिबद्ध भूमिका असल्याचे समजते. शहराचे सुशासन आणि नागरिकहिताला प्राधान्य देण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प अनेक तरुण मतदारांना आकर्षित करीत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी बसपाने तरुण आणि उच्चशिक्षित चेहऱ्यावर विश्वास दाखविल्याने या निवडणुकीत नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. चैताली मद्रिवार यांच्या दावेदारीमुळे बसपा या वेळेस मजबूत आणि आक्रमक भूमिकेत दिसत आहे.आगामी दिवसांत पक्ष अधिकृत उमेदवारी जाहीर करणार असून चैताली मद्रिवार या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मूल नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक चुरशीची व लक्षवेधी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular