Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबेंबाळ–जुनासुर्ला जिल्हा परिषद गटात सरपंच शारदा येनुरकर यांची दमदार दावेदारी

बेंबाळ–जुनासुर्ला जिल्हा परिषद गटात सरपंच शारदा येनुरकर यांची दमदार दावेदारी

मूल, प्रतिनिधी :
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बेंबाळ–जुनासुर्ला गटातून सरपंच शारदा येनुरकर यांनी जोरदार दावेदारी सादर केली आहे. गडीसुर्ला येथील दोन टर्म सरपंच व एकदा उपसरपंच राहिलेले संजय येनुरकर यांची त्या धर्मपत्नी असून सध्या गडीसुर्ला ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा अनुभव आणि क्षेत्रातील मजबूत संपर्क जाळ्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
शारदा येनुरकर या उच्चशिक्षित असून मनमिळाऊ स्वभाव, शांत नेतृत्व आणि समन्वयक वृत्तीमुळे गावोगाव त्यांची चांगली प्रतिमा आहे. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, शिक्षण व महिला सक्षमीकरण यांसारख्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या असून या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्या पोटतिडकीने प्रयत्नशील राहतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या गटाचे आरक्षण ना.म.प्र. महिला असल्याने येनुरकर यांच्या दावेदारीला अधिक बळ मिळाले आहे. भाजप पक्षाच्या शिस्तबद्ध कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. विशेष म्हणजे या क्षेत्राचे आमदार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परिणामी, पक्षांतर्गत पातळीवर त्यांना भक्कम समर्थन मिळत असल्याचे दिसते.
भाजपच्या अंतर्गत झालेल्या सर्व्हेत शारदा येनुरकर या पहिल्या क्रमांकावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या गटातील भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक राजकारणात चांगलाच खळबळाट निर्माण झाला आहे.
एकूणच, विकासनिष्ठ दृष्टिकोन, स्थानिक पातळीवरील मजबूत पकड, सर्वसमावेशक स्वभाव आणि नेतृत्वाचा आधार यामुळे शारदा येनुरकर यांची दावेदारी सध्या सर्वात प्रबळ मानली जात आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular