Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार मूल तालुक्यातील बेलघाटा येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार मूल तालुक्यातील बेलघाटा येथील घटना

मूल : तालुक्यातील बेलघाटा येथील गुराखी पितांबर गुलाबराव सोयाम (वय ३६) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी उघडकीस आली. ही घटना कन्हाळगाव क्षेत्रातील सेवकराव येसाजी कोवे यांच्या शेतात घडली.
मृत पितांबर सोयाम हे शनिवारी (दि. १३ डिसेंबर) गुरे चारण्यासाठी शेतशिवारात गेले होते. मात्र सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु ते आढळून आले नाहीत. रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा शोध मोहीम राबवित असताना ग्रामस्थांना सेवकराव कोवे यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी वाघाच्या हल्ल्याच्या खुणा दिसून आल्याने वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. तसेच मृताच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular