Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआज नळातून वाहणारं पाणी, भाजपच्या कामाची साक्ष आहे

आज नळातून वाहणारं पाणी, भाजपच्या कामाची साक्ष आहे

मुल प्रतिनिधी ; आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयासानेच भाजपच्या काळातच मूल शहरासाठी कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन टाक्या, पाइपलाइन आणि जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली. पाणीपुरवठ्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद केली जाते.ज्या ठिकाणी तोडफोड, गळती किंवा तांत्रिक बिघाड होतो, तिथे त्वरित दुरुस्ती करण्यात येते.
काही कारणास्तव तात्पुरती अडचण निर्माण होते याचे कारण म्हणजे, वाढती लोकसंख्या,जुनी जीर्ण नळजोडणी,काही ठिकाणी बेकायदेशीर कनेक्शन.यासाठी राजकीय स्वार्थातून अपप्रचार म्हणजे विरोधकांची हिम्मत खचली असे दिसत आहे.
ज्यांनी वर्षानुवर्षे लोकांना नुसतं आश्वासनं दिले,तेच आज जनतेला भडकवण्याचे काम करत आहेत.
भाजप मात्र बोलघेवड्या राजकारणाऐवजी कामावर विश्वास ठेवतो.भाजपचे ध्येय स्पष्ट आहे, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ, नियमित व पुरेसा पाणीपुरवठा.
भाजपने २४×७ पाणीपुरवठ्याचा संकल्प नक्कीच केला आहे.मात्र तांत्रिक मर्यादा, जुनी पाइपलाईन व्यवस्था, वाढती लोकसंख्या आणि पाणीस्रोतांची क्षमता यामुळे तो संकल्प पूर्णतः १००% तात्काळ राबवता येऊ शकला नाही.
मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आजही मूल शहरातील नागरिकांना रोज नियमितपणे पाणीपुरवठा सुरू आहे.एकही दिवस असा नाही की शहराला पूर्णतः कोरडं ठेवण्यात आलं आहे.
२४×७ पाणी वितरण चा प्रकल्प आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा ध्येय आहे.
मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपने केवळ आश्वासन नाही दिलं, तर,टाक्या उभारल्या,पाईपलाईन टाकल्या,जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू केल्या आणि हळूहळू 24×7 जल वितरण करणे त्या दिशेने ठोस पावलं उचलली आहेत.फरक इतकाच आहे की, विपक्ष फक्त बोलते,भाजप काम करत पुढे जाते.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular