Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनियम वाचणारे अनेक; पण निधी खेचून आणणारे 'सुधीरभाऊच'!!

नियम वाचणारे अनेक; पण निधी खेचून आणणारे ‘सुधीरभाऊच’!!

मुल
नगरपरिषद केवळ नियम-कायदे वाचून नाही चालत;तर दूरदृष्टी, नियोजन,प्राधान्यं ठरवण्याची क्षमता आणि सरकारी यंत्रणेतून निधी खेचून आणण्याचं कौशल्य गरजेचं असतं.फक्त नियम/कायदे माहित राहून आणि नुसतं वेळ देऊन शहराचा विकास होत नाही.
विकास होतो निधी मिळवून, प्रकल्प राबवून आणि प्रशासनाशी समन्वय साधून. आणि ही सर्व गुणवैशिष्ट्ये ज्या नेतृत्वात आहेत,त्या म्हणजे,प्रा. डॉ. किरण किशोर कापगते.

आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनामुळे निधीची चिंता नाही.
शहरातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक आहे की,मूल शहराच्या विकासासाठी लागणारा निधी केंद्र, महाराष्ट्र शासन आणि स्थानिक आमदार मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या थेट मार्गदर्शनामुळे सहज उपलब्ध होऊ शकतो. शहरातल्या रस्त्यांपासून पाणीपुरवठ्यापर्यंत, स्वच्छतेपासून आधुनिक सुविधांपर्यंत,निधी हा कोणत्याही विकासकामाचा कणा आहे.आणि हा कणा मजबूत असताना, अनुभवी नेतृत्व मिळाल्यास विकास जलद घडतो, टिकतो आणि पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरतो.
प्रा. कापगते ह्या अनुभव, व्यवस्थापनकौशल्य आणि शासकीय नेटवर्कमध्ये मजबूत व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर:

अनेक वर्षांचा अध्यापन अनुभव

सामाजिक व शैक्षणिक कार्यात सातत्य

शहरातील नागरिकांमध्ये विश्वास

वेळेचं काटेकोर नियोजन

सर्व शासकीय पातळ्यांशी प्रभावी समन्वय

या सर्व गुणवत्तेमुळे मूल शहरासाठी सक्षम, प्रभावी आणि परिणामकारक नेतृत्व म्हणून प्रा. डॉ. किरण कापगते यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.
त्या केवळ वेळ देणारच नाहीत,
तर दिलेला वेळ शहराच्या विकासात रूपांतरित करतील.

सुजाण मतदारांचा योग्य निर्णय
आज मूल शहर एका निर्णायक टप्प्यावर उभं आहे.शहराचा भविष्यातील विकास हा योग्य नेत्याच्या निवडीवर अवलंबून आहे.
आणि या निकषांवर प्रा. डॉ. किरण कापगते या सर्वार्थाने पात्र, सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय ठरतात,हे वास्तव स्वतःच बोलतं.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular