मूल (प्रतिनिधी) :
मूल नगरपरिषद निवडणूक जसजशी रंगतदार होत आहे, तसतशी प्रभाग क्रमांक ५ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार सौं. भारती गणेश मेश्राम यांचा प्रचारही जोर धरत आहे. शांत, हसतमुख व सहजसोप्या स्वभावामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. घराघरात जाऊन त्या मतदारांशी थेट संवाद साधत असून महिलांच्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक ५ विषयी त्यांना असलेली सखोल इत्ताभूत माहिती, स्थानिक प्रश्नांवरील त्यांची स्पष्ट भूमिका आणि नागरिकांसोबतचा सततचा संपर्क यामुळे त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रभागातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये सौं. मेश्राम यांची चांगली ओळख असून अनेक वर्षांपासून सामाजिक व लोकाभिमुख कार्यात सक्रिय सहभाग असल्याने त्या ‘समाजात प्रचलित चेहरा’ म्हणून ओळखल्या जातात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्यासोबतच विकासकार्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन त्या देत आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी उपयुक्त उपक्रम, युवकांना प्रोत्साहन अशा प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याचे दिसते.
काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रचारात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सौं. भारती गणेश मेश्राम यांच्या उमेदवारीमुळे लढत रंगतदार झाली असून त्यांच्या प्रचारातील आघाडीमुळे निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे.



