Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल नगर परिषद निवडणुकीत गाजतोय मुबलक पाणीपुरवठ्याचा विषय

मूल नगर परिषद निवडणुकीत गाजतोय मुबलक पाणीपुरवठ्याचा विषय

मुबलक पाणीपुरवठ्याचा आश्वासनांचे दाखविले होते गाजर

प्रचारावेळी भाजपच्या नगरसेवकांची होतेय कोंडी

मूल: शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.मागील पंचवार्षिक मध्ये सत्तेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी शहर वासियांना स्वच्छ पाण्यासह दोन वेळा मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.दोन वेळा तर सोडा एक वेळा सुद्धा व्यवस्थित पाणी नागरिकांना मिळत नसल्याची ओरड मागील वर्षभरापासून महिलांकडून होत आहे.त्यामुळे प्रचारावेळी गेलेल्या माजी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून प्रचारादरम्यान त्यांची चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मूल शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान अभियानाअंतर्गत सन २०१९ मध्ये २८ कोटी ८८ लाख रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.मुल शहराला दररोज जवळपास ४० हजार लिटर पाण्याची गरज आहे.आधीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची ही व्याप्ती अडीच पट वाढली आहे.मूल शहरात आज घडीला नळधारकांची संख्या ५ हजारावर आहे.त्यानुसार सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेला पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.मात्र शहरातील काही भागात नळाला बारीक धार येत असल्याने नागरिकांना आवश्यक पाणी मिळत नाही.त्यामुळे महिला कमालीच्या त्रस्त झाल्या असून नगरपरिषद प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये कमालीच्या असंतोष पसरला आहे. सध्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने मागील वर्षी सत्तेत असलेल्या माजी नगरसेवकासह त्यांच्या पक्षाच्या समर्थित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला प्रचारावेळी महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.तर विरुद्ध पक्षाला या विषयावर घेरण्याची संधी चालून आली आहे त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत पाणीपुरवठ्याच्या विषय चांगलाच गाजत आहे.

योजनेसाठी लाखोचा खर्च: पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती,तुरटी,ब्लिचिंग क्लोरीनसाठी,बोरवेल दुरुस्ती,साहित्य खरेदी व विज बिलावर वर्षापोटी लाखो रुपयांचा खर्च केला जातो.मात्र नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही वर्षाला लाखो रुपये पाणीकर वसूल करण्यात येतो तरीही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही.त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे कारण काय?:वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या आजतागायत चार पाण्याच्या टाकी आहेत.त्याची पाणीपुरी पाणी साठवणूक क्षमता २०.३ लाख लिटर एवढी आहे.जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता ६.५ दशलक्ष लिटर आहे.तरीही मूल शहराला पाण्याचां तुटवडा असून मुबलक पाणीपुरवठा होत नाही.त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते हे एक कोडेच आहे

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular