मूल, प्रतिनिधी :
मूल नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून विविध पक्षांतील उमेदवार जनतेपुढे आपापली ताकद दाखवत आहेत. मात्र या सर्व उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांच्या प्रचाराची जोरदार चर्चा सध्या शहरभर आहे. त्यांच्या संघटित कार्यशैली, दमदार जनसंपर्क, महिला व युवकांचा वाढता सहभाग आणि शहराच्या विकासाबाबतचे स्पष्ट व्हिजन यामुळे एकता समर्थ या निवडणुकीत ठळकपणे पुढे असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये घेतलेल्या दौऱ्यांमध्ये समर्थ यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी त्यांच्या प्रचारयात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे. त्यांच्यासमोर नागरिकांकडून रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पर्यटन विकास, बाजारांचे आधुनिकीकरण, महिलांसाठी सुरक्षा व सुविधा अशा विविध समस्या मांडल्या जातात व समर्थ त्या बारकाईने ऐकून त्या संदर्भात ठोस उपाययोजना मांडतात, हे विशेष ठरत आहे.
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “एकता समर्थ या युवा, शिक्षित आणि प्रशासनाची जाण असलेली उमेदवार आहेत. त्यांच्या विजनमुळे मूळ शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल.” महिला मतदार आणि युवकांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय वाढला असून सोशल मीडियावरही त्यांचा प्रचार जोमात आहे.
एकता समर्थ यांचे मूळ शहरासाठीचे व्हिजन
प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधांची समान उपलब्धता
पाणीपुरवठ्याचे शाश्वत नियोजन
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचरा व्यवस्थापन
महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा
रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रे
शहरातील वाहतूक व बाजार व्यवस्थेचे नियोजन
खुल्या जागांचा हरित विकास व स्वच्छ शहर मोहीम
या सर्व उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये “शहर बदलणार तो काँग्रेसच्या उमेदवारामुळेच” अशी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. विरोधकांकडे सध्या ठोस नेतृत्वाचा अभाव असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे, तर काँग्रेसमध्ये एकता समर्थ यांच्या नावाभोवती चांगले एकजूट वातावरण जाणवते.
सध्याच्या राजकीय वातावरणावरून पाहता, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एकता समर्थ या आघाडीच्या भूमिकेत असल्याचे राजकीय विश्लेषकही मान्यत आहेत.
निवडणूक जवळ येत असताना त्यांचा प्रचार आणखी वेग घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



