Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल नगर परिषद निवडणूक 2025प्रभाग क्र. 7 मध्ये अपक्ष उमेदवार कुणाल गायकवाड...

मूल नगर परिषद निवडणूक 2025प्रभाग क्र. 7 मध्ये अपक्ष उमेदवार कुणाल गायकवाड यांच्या रिंगणात उतरण्याने राजकीय समिकरणे ढवळून निघाली

मूल, प्रतिनिधी :
मूल नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. काल चिन्हवाटप झाल्यानंतर प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचारयात्रांना वेग दिला असून मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये मात्र सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अपक्ष उमेदवार कुणाल पुरुषोत्तम गायकवाड.

उच्च शिक्षित, शांत स्वभावाचे आणि प्रभागातील लोकांमध्ये मदतीसाठी सदैव धावून जाणारे म्हणून ओळख असलेले कुणाल गायकवाड हे मतदारांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. B.Sc., B.Ed. असे उच्च शिक्षण घेतलेले गायकवाड यांनी मागील विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी दाखल करत आपली ताकद दाखवून दिली होती.

प्रभागातील तरुण मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण दिसून येत असून सामाजिक, शैक्षणिक व स्थानिक प्रश्नांवर त्यांनी मांडलेले मतदारहिताचे विचार चर्चेत आहेत. यामुळे प्रभागातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. पक्षीय उमेदवारांना अपेक्षित असलेली सरळ लढत आता त्रिकोणी होण्याची शक्यता असल्याने प्रचाराचे गणित पूर्णपणे बदलत चालले आहे.

सध्या गायकवाड यांचा घराघरात संपर्क, युवकांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरचे मांडणीमुळे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या मुद्यांवर त्यांनी मांडलेल्या भूमिका सकारात्मक मानल्या जात असून यामुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्र. 7 मधील ही निवडणूक आता अधिक चुरशीची झाली असून अपक्ष उमेदवार कुणाल गायकवाड यांच्यामुळे राजकीय समीकरणे नव्याने आखली जात आहेत. पुढील काही दिवसांत प्रचार अधिक वेग घेणार असून मतदार कोणावर विश्वास ठेवतात हे ३ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular