Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूल नगर परिषद निवडणूक रणधुमाळी 2025प्रभाग ८ मध्ये काँग्रेसच्या ज्योती चटारे यांना...

मूल नगर परिषद निवडणूक रणधुमाळी 2025प्रभाग ८ मध्ये काँग्रेसच्या ज्योती चटारे यांना नागरिकांचा वाढता उत्स्फूर्त पाठिंबा

मूल :
मूल नगर परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असून प्रत्येक प्रभागात प्रचारयुद्धाला जोर चढू लागला आहे. अशात प्रभाग क्रमांक ८ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार सौ. ज्योती चटारे यांच्या प्रचाराला विशेष गती मिळत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभत आहे.

सौ. चटारे यांनी उमेदवारी निश्चित होताच प्रभागातील नागरिकांशी सातत्याने भेटीगाठी सुरू केल्या आहेत. घराघरात जाऊन त्या डोअर-टू-डोअर जनसंपर्क करत असून नागरिकांच्या अडचणी, स्थानिक समस्या, मूलभूत सुविधांची कमतरता आणि प्रलंबित प्रश्न यांची माहिती घेत आहेत. प्रभागातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक कुटुंबाशी नातं जोडण्याचा त्यांचा प्रयत्न नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे.

स्थानिक नागरिक त्यांना प्रामाणिक, समंजस आणि समस्या सोडविण्याची क्षमता असलेली उमेदवार म्हणून पाहत आहेत. “प्रभागातील विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था या प्रश्नांची जाण ज्योती ताईंना आहे आणि या समस्या ताईंच्या नेतृत्वात सुटतील,” असे मत अनेकांनी व्यक्त केले. काही ठिकाणी नागरिकांनी तर “या वेळेला आमच्या प्रभागाची नगरसेविका म्हणून ज्योती ताईंचीच निवड होणार,” असा ठाम विश्वासही मांडला.

प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद, महिलांचा सहभाग, युवकांची साथ आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास यामुळे सौ. ज्योती चटारे यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून प्रभाग ८ मधील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular