मूल, प्रतिनिधी :
मूल नगर परिषद निवडणूक तापायला सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षाने या वेळी बलाढ्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर अशी मजबूत तिकडी मैदानात उतरवली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सौं. एकता प्रशांत समर्थ, तर प्रभाग क्र. ८ मधून अतुल रवि गोवर्धन आणि सौं. ज्योती चंद्रकांत चटारे यांना उमेदवारी देत काँग्रेसने निवडणुकीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तिन्ही उमेदवारांच्या अर्जांनंतर पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांच्या चर्चेतही काँग्रेसची ही तिकडी केंद्रस्थानी आली आहे.
सौं. एकता प्रशांत समर्थ : सामाजिक कार्याची ओळख, शांत नेतृत्वाची ताकद
काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सौं. एकता समर्थ या शिक्षित, सौम्य स्वभावाच्या आणि सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती म्हणून परिचित आहेत. पती प्रशांत समर्थ यांच्या माध्यमातून दुर्गा उत्सव मंडळाद्वारे राबविलेले अनेक उपक्रम, मदत मोहिमा, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
शहरात त्यांना “सर्वांची एकता ताई” म्हणून प्रेमाने ओळखले जाते. महिलांचा आणि युवकांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत असून त्यांच्या अर्जानंतर काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे.
प्रभाग क्र. ८ : अतुल रवि गोवर्धन — तरुणाईचा आवाज
अनु. जाती प्रवर्गाच्या प्रभाग क्र. ८ मधून अतुल गोवर्धन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- साधा, मनमिळावू स्वभाव
- प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, नागरिकांच्या अडचणींवर सातत्याने पाठपुरावा
- युवकांना रोजगारमार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रमात सहभाग
अतुल गोवर्धन यांच्या “घराघरातील” जनसंपर्क मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नागरिक त्यांना “आपला मुलगा” म्हणून पाहतात. युवा आणि नवमतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
प्रभाग क्र. ८ : सौं. ज्योती चंद्रकांत चटारे — अनुभव, संयम आणि महिलांचा विश्वास
या प्रभागातील काँग्रेसची दुसरी उमेदवार सौं. ज्योती चटारे ही शांत, संयमी आणि लोकाभिमुख कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात.
गेल्या काही वर्षांत महिलांचे प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत समस्या, वयोवृद्धांच्या गरजा यावर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रीत केले.
त्यांच्या जनसंपर्क मोहिमेत महिलांचा मोठा सहभाग दिसत असून प्रभागात त्यांची प्रतिमा “उपलब्ध आणि विश्वासार्ह” उमेदवार अशी निर्माण झाली आहे.
काँग्रेसची तिकडी : समाजाभिमुख, लोकसंपर्कात मजबूत आणि विकासाभिमुख
सौं. एकता समर्थ यांचे शहरव्यापी सामाजिक कार्य, अतुल गोवर्धन यांची तरुण नेतृत्वशैली आणि सौं. ज्योती चटारे यांचा शांत परंतु प्रभावी नागरिकसंपर्क — या तिन्ही उमेदवारांमुळे काँग्रेसची निवडणूक रणनीती अधिक भक्कम झाली आहे.
पक्षातील पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या तिकडीच्या प्रचारात झोकून देत असल्याने काँग्रेसच्या प्रचाराला अनोखा वेग मिळाला आहे.
शहरात एकच चर्चा : “काँग्रेसची तिकडी दमदार…!”
अर्ज दाखल होताच नागरिकांमध्ये चर्चा रंगात आली —
“समर्थचं सामाजिक कार्य, गोवर्धनची तरुणाई आणि चटारे यांचा अनुभव — काँग्रेसची तिकडी मजबूत आहे.”
काँग्रेसने दिलेल्या तिन्ही उमेदवारांच्या लोकसंपर्कातून सकारात्मक वातावरण तयार होत असून शहरात एकच सूर ऐकू येतोय —
“या वेळी बदल… काँग्रेस मजबूत!”
मूल नगर परिषद निवडणुकीतील पुढील घडामोडींवर आता नागरिकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.



