Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedदलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

शेकडो च्या संख्येने नागरिक उपस्थित

मूल:देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केले.या घटनेचे संपूर्ण देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत.अमित शाह यांच्या वक्तव्याचा व अॅड.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २४) मूल येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला.यात तालुक्यातील हजारो आंबेडकरी बांधवांनी सहभाग घेतला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. बाबासाहेबांचा भर संसदेत अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा,आंबेडकरवादी अड. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, परभणीतील संविधानाच्या प्रतिची विटंबणा करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जन्मठेपाची शिक्षा देण्यात यावी. पोलिसांच्या मारहाणीत मृत पावलेल्या अॅड.सूर्यवंशी यांच्या कुटंबीयांना शासनाने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मूल शहरातील ताडाळा रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा ला सुरुवात झाली. मोर्चाला सुरवात झाली.यावेळी मूल तालुक्यातील हजारो आंबेडकरी अनुयायी एकत्र आले.मुख्य मागनि मोर्चा काढण्यात आला.यावेळी अमित शाह यांचा तीव्र निषेध व्यक्त करित त्यांचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी रेटून धरण्यात आली.महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत घोषणाबाजी केली.मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही आणि शाह यांनी राजीनामा दिला नाही,तर यापेक्षा अधिक आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंबेडकरी अनुयायांनी दिला.निवेदन देताना डेव्हिड खोब्रागडे,काजू खोब्रागडे,सुरेश फुलझले, पुरुषोत्तम साखरे,सुजित खोब्रागडे, अतुल गोवर्धन, प्रशांत उराडे,आकाश दहीवले,सूरज निमगडे,बंडू गेडाम,लालाजी मानकर,संदीप रायपुरे,जीतू लोणारे,अनंता शेंडे,राजपाल खोब्रागडे,प्रभाकर गोवर्धन,चंदू बनसोड,प्रकाश चंदणखेडे,कालिदास खोब्रागडे,भगीरथ गेडाम,महादेव वाकडे,सुधाकर साखरे,संजय रामटेके,मिलिंद भडके, प्रफुल वाकडे, गुलशन लाकडे, सोनू गोंगले,रणजित उराडे,नितीन खोब्रागडे,हरिदास वाळके,तीमाजी गोवर्धन,प्रशांत गोवर्धन,किशोर निमगडे,प्रफुल वाळके,अमोल खोब्रागडे, गुलाचांद खोब्रागडे,ताराचंद खोब्रागडे,विपुल तावाडे,कैलास घडसे,सरोज खोब्रागडे,ओमाजी गेडाम,रजनी मेटे,उध्दव अवताडे,चेतन गणवीर,धीरज वाळके,दिलीप वाळके,बाबुलाल झाडे,संजय फुलझले,संजय उराडे,मधुकर उराडे,मधुकर गेडाम सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular