Sunday, April 19, 2026
Google search engine
Homeमुलजानाळा येथे १८ फेब्रुवारीला मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

जानाळा येथे १८ फेब्रुवारीला मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सक्षम फाउंडेशन तथा सौरभ वाढई व धनराज रामटेके मित्रपरिवारांचा पुढाकार

मूल : तालुक्यातील जानाळा येथे राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, मुंबई, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर,सक्षम फाउंडेशन तथा सौरभ वाढई व धनराज रामटेके मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर,आधार अपडेट व आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रुग्णांची तपासणी, नागपूर येथे ने-आण, शस्त्रक्रिया तसेच राहण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णतः मोफत असणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सक्षम फाउंडेशनने शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी,आधार कार्ड अपडेट व आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे.या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौरभ वाढई व धनराज रामटेके मित्रपरिवाराने केले आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular