Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबहिणींचा आवाज बुलंद, अफवांना नाही तर सुधीरभाऊंच्या विकासासाठीच मतदान!

बहिणींचा आवाज बुलंद, अफवांना नाही तर सुधीरभाऊंच्या विकासासाठीच मतदान!

मूल
नगर परिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा.सौ.किरण किशोर कापगते यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून संपूर्ण राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भाजपचे दिग्गज नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासाच्या ‘आंधी’ने विरोधकांना अक्षरशः अस्वस्थ करून सोडले आहे.
सत्तेत येण्याचे स्वप्न आता दूर जात असल्याचे वास्तव लक्षात येताच विरोधक बेताल वक्तव्यांच्या मार्गावर आले असून, जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र मूल शहरातील जागरूक नागरिक, गेल्या अनेक वर्षांत मुनगंटीवारांनी केलेला विकास प्रत्यक्ष अनुभवत आहेत. रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सोयी-सुविधांमध्ये झालेली प्रगती सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे.
विरोधकांची राज्यात सत्ता असताना अपेक्षित विकास झाला नाही, तसेच त्यांच्या खासदारांनीही आजवर आपल्या मतदारसंघासाठी ठोस निधी आणला नसल्याची चर्चा जनतेत उघडपणे होत आहे. त्यामुळे विकासाची खरी परिभाषा विरोधकांना अद्याप समजलेली नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे.
आज विरोधकांकडे उरले आहे ते फक्त खोटे आरोप, अफवा आणि तरुणांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचे प्रयत्न. मात्र मूल शहरातील महिला, भगिनी आणि सुजाण नागरिक या सर्व प्रकारांना मतदानातून भाजपच्या बाजूने ठाम उत्तर देणार, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षच्या उमेदवार प्रा. सौ. किरण कापगते यांच्या राजकीय उदयानंतर विरोधकांची झोप उडाली असून, त्यांच्या डोळ्यांवर आता पराभवाची स्पष्ट झळ बसत असल्याचे चित्र सध्या मुलच्या राजकारणात दिसून येत आहे.
थोडक्यात सांगायचं तर, मुनगंटीवारांचा विकास, कापगतेंची उमेदवारी आणि जनतेचा वाढता पाठिंबा,या तिन्ही घटकांनी मुलमधील निवडणूक आता एकतर्फी भाजपकडे झुकत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular